आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणेमहानगरेमहाराष्ट्रराजकारण

ऋणानुबंधाच्या या गाठी : २२ वर्षांपासून सारथ्य करणाऱ्या मनवेमामांच्या घरी अजितदादा सदिच्छा भेट देतात तेव्हा..

पुणे
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच आपल्यासोबत काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेत असतात. सोबतच त्यांच्या कुटुंबीयांशीही तितकाच स्नेह ठेवत असतात. २२ वर्षांपासून सारथ्य करणाऱ्या शामराव मनवे यांच्या घरी अजितदादांनी आपले सुपुत्र जय पवार यांच्यासह सदिच्छा भेट देऊन मनवे कुटुंबीयांशी संवाद साधला. अजितदादांच्या या सदिच्छा भेटीमुळे मनवे कुटुंबीयही आनंदून गेले.

श्यामराव मनवे हे उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्याकडे तब्बल २२ वर्षांपासून चालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याशी अजितदादांचा नेहमीच स्नेह राहिला आहे. त्यामुळेच अजितदादांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत मनवे कुटुंबियांच्या घरी सदिच्छा भेट दिली. विशेष म्हणजे, दादांसोबत युवा नेते जय पवार यांनीही मनवे कुटुंबीयांची भेट घेत संवाद साधला.

अजित पवार हे आपल्या कार्यशैलीमुळे आणि कडक स्वभावामुळे प्रसिद्ध आहेत.  त्यांचा हा स्वभाव विविध कामे मार्गी लावताना उपयोगी पडणारा आहे. असे असले तरी सार्वजनिक जीवनातील अनेक प्रसंग अजितदादांच्या भावूक आणि मनमुराद स्वभावाची प्रचिती देत असतात. त्यातलाच एक प्रसंग म्हणजे मनवे कुटुंबियांची सदिच्छा भेट. यावेळी श्यामराव मनवे यांच्यासह त्यांची मुले नितीन आणि सचिन यांनी पुष्पगुच्छ देऊन दादांचे स्वागत केले. 

आजितदादांनी मनवे कुटुंबियातील सदस्यांशी हितगुज साधतानाच प्रत्येकाची आस्थेवाईकपणे चौकशी करणे असो की वर्षानुवर्षे आपल्यासोबत असलेल्या श्यामराव मनवे यांच्याबद्दल दाखवलेली आस्था. यातून अजितदादांचा आपल्या कर्मचारी वर्गाप्रती असलेला स्नेह अनुभवायला मिळाला.

वास्तविक आजच्या काळात अनेकांना आपल्यासोबत करणाऱ्या लोकांची माहितीही नसते. मात्र राज्याच्या कारभाराचा गाडा हाकत असताना आपल्यासोबत असलेल्या  कर्मचाऱ्याच्या घरी सदिच्छा भेट देत त्या कुटुंबीयांशी संवाद साधत अजितदादांनी त्यांचे वेगळेपण दाखवून दिले.  अजितदादांच्या या स्वभावामुळे महाराष्ट्रातील जनता त्यांना ‘माणूस जीवाभावाचा’ म्हणते याचीच पुन्हा एकदा प्रचिती आली.          


ह्याचा प्रसार करा
पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us