Site icon Aapli Baramati News

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत भगत-माने विवाह सोहळा संपन्न

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना व कर्जत तालुक्यातील अंबालिका शुगरचे माजी कार्यकारी संचालक आणि वारणा कारखान्याचे विद्यमान कार्यकारी संचालक शहाजीराव भगत यांचे ज्येष्ठ सुपुत्र संकेत आणि सातारा जिल्ह्यातील रहीमतपुर येथील शशिकांत माने यांची सुकन्या प्रियांका यांचा शाही विवाह सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील ॲमेनोरा क्लब हाऊस येथे संपन्न झाला. 

अत्यंत नियोजनबद्ध व्यवस्थापनात पार पडलेल्या या विवाह सोहळ्यास वारणा उद्योग समुहाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे, शिरूर तालुक्याचे आमदार अशोक पवार, दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल, आमदार बबनराव पाचपुते, माजी मंत्री राम शिंदे, आमदार सुरेश धस, आमदार संजय शिंदे, पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर हे उपस्थित होते. 

शहाजीराव भगत हे गेली तीस वर्षे साखर उद्योगात कार्यरत असून अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून त्यांचा राज्यभर नावलौकिक आहे. त्यांच्या स्नेहपूर्ण संबंधांमुळे राज्यातील अनेक कारखान्याचे संचालक, कार्यकारी संचालकांसह साखर आयुक्त कार्यालयातील संचालक पांडुरंग शेळके, संजीवकुमार भोसले, दिल्ली येथील एनसीडीसीचे चीफ डायरेक्टर कर्नल विनोदकुमार यांच्यासह विविध बॅंकाचे मॅनेजर, अनेक शासकीय अधिकारी उपस्थित होते. 

शहाजीराव भगत यांचे बंधू वरीष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत हे नवी मुंबई नेरूळ पोलीस ठाण्याचे प्रभारी असून मुंबई पोलिस दलातील अनेक वरीष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.भगत व माने कुटुंबियांचे स्नेही, आप्तेष्ट यांच्या बरोबरच राजकीय, सहकार, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभास अत्यंत व्यस्त व्यापातून अजितदादा पवार यांनी अर्धा तास वेळ दिला. कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटकोरपणे पालन करीत हा अविस्मरणीय सोहळा पार पडला.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version