आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्रमुंबईराजकारण

उद्धव ठाकरे सर्वोत्तम पाच मुख्यमंत्र्यांमध्ये; इंडिया टुडेनं केलं सर्वेक्षण

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारपणामुळे सार्वजनिक कार्यक्रमात जास्त सक्रिय नसले तरी त्यांची लोकप्रियता कायम आहे. ‘इंडिया टुडे’ समूहाने देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीचे सर्वेक्षण केले. या नऊ सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे चौथ्या स्थानी आहेत.

विशेष म्हणजे देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीवेळी चर्चेत असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा नऊ मुख्यमंत्र्यांमध्ये समावेश नाही. नऊ मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपाच्या केवळ एकाच मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. 

इंडिया टुडे समूहाने केलेल्या सर्वेक्षणानुसार,  प्रत्येक राज्यातील लोकांना त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबद्दल विचारण्यात आले. ४३ टक्केहून अधिक मत मिळालेल्या देशातील सर्वोत्तम नऊ मुख्यमंत्र्यांची यादी इंडिया टुडे समूहाने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे पहिल्या क्रमांकावर आहेत. सुमारे ७१ टक्के लोक त्यांच्या कामावर समाधानी आहेत. 

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत नवीन पटनायक यांच्या नंतर दुसऱ्या स्थानावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंबर लागतो. ममता बॅनर्जी यांच्या कामावर ६९ टक्के जनता समाधानी आहे. ममता बॅनर्जी यांच्या खालोखाल तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आहेत. त्यांनी केलेल्या कामावर ६७ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे. 

एम. के. स्टॅलिन यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चौथ्या स्थानावर आहेत. त्यांनी केलेल्या कामावर ६१ लोक समाधानी आहेत. तर पाचव्या स्थानावर केरळचे मुख्यमंत्री ६१.६  टक्के जनता त्यांच्या कामावर समाधानी आहे.


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us