Site icon Aapli Baramati News

‘आता हळद लावून बसलोय; पण तो बाबा लग्न लावून द्यायला तयार नाही’ : आनंद शिंदे

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

विधानपरिषद नियुक्तीसाठी महाविकास आघाडी सरकारने १२ सदस्यांची यादी राज्यपालांकडे पाठवली आहे. मात्र अद्यापही राज्यपालांनी याला मंजूरी दिलेली नाही. त्यामुळे प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता हळद लावून बसलोय पण तो बाबा लग्न लावून द्यायला तयार नाही, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.    

‘जो पर्यंत गाणी गात होतो, तोपर्यंत लय चांगलं होतं. पण जेव्हा आमदारकीसाठी गेलो तेव्हा गाणंही बंद झालं अन् सगळचं बंद झालं. एवढी मजामस्ती कोणीच केली नसेल, पण आमदारकीची स्वप्नं पाहिली आणि गोंधळ झाला,” असे म्हणत एका कार्यक्रमादरम्यान आमदारपदासाठी इच्छुक असलेले आनंद शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली.

राष्ट्रवादी कॉग्रेसकडून आनंद शिंदे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. ‘आता हळद लावून बसलो पण तो बाबा लग्न लावून द्यायला तयार नाही’, असे म्हणत आनंद शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, येत्या जानेवारी २०२२ मध्ये विधानपरिषदेतील आठ आमदार निवृत्त होत आहेत. त्यामध्ये सतेज पाटील (काँग्रेस) कोल्हापूर , रामदास कदम (शिवसेना) मुंबई, भाई जगताप ( काँग्रेस ) मुंबई, प्रशांत परिचारक (अपक्ष) सोलापूर , अमरिश पटेल (भाजप) धुळे- नंदुरबार, गोपीकिशन बजोरिया (शिवसेना) अकोला- बुलढाणा, गिरिशचंद्र व्यास (भाजप) नागपूर, अरूण जगताप (राष्ट्रवादी) अहमदनगर यांचा समावेश आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version