
मुंबई : प्रतिनिधी
हिंदी मालिकांप्रमाणेच मराठी मालिकाही अधिक लोकप्रिय झाल्या आहेत. स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने खूप कमी कालावधीत प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. इतकेच नव्हे,तर या मालिकेतील कलाकारांनी अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकली आहेत. अनेक मराठी मालिकेतील कलाकारांच्या खर्या आयुष्यातील गोष्टी जाणून घेण्याची चाहत्यांना खूप उत्सुकता असते.
‘आई कुठे काय करते’ मालिकेतील आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे मधुराणीने प्रभुलकर. तिने साकारलेल्या या भूमिकेसाठी तिचे खूप कौतुक केले जात आहे. मधुराणी सोशल मीडियावर बर्यापैकी सक्रिय असते. नुकतीच तिने एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालत आहेत.
मधुराणीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूप ग्लॅमरस दिसत आहे. साडी आणि शॉर्ट हेअरमधील तिच्या या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंती दर्शविली आहे. तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा पाऊसच पडताना दिसत आहे.
अभिनेत्री मधुराणीविषयी बोलायचे झाले, तर मधुराणी इंद्रधनुष्य, असंभव यासारख्या जुन्या मालिकेतही भूमिका साकारताना दिसली. तर सुंदर माझं घर, गोड गुपित, समांतर, नवरा माझा नवसाचा, मणी मंगळसूत्र यासारख्या मराठी चित्रपटात काम केल्यानंतर तिने अनेक चाहत्यांची मने जिंकली. मधुराणीने स्वत: अभिनयाच्या जोरावर मनोरंजन विश्वात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे.