Site icon Aapli Baramati News

अवसरीतील जळीत उसाचे त्वरित पंचनामे करण्याची माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची मागणी

ह्याचा प्रसार करा

इंदापूर : प्रतिनिधी

माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील अवसरी येथे शुक्रवारी झालेल्या जळीत ऊस पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शासनाने या घटनेचे त्वरीत पंचनामे करून अवसरी येथील शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी केली.

शेतकऱ्यांनी जीवापाड कष्ट करून ऊस पीक सांभाळले होते. त्याला तोडही आली होती. परंतु अचानक लागलेल्या आगीने ३५ एकरांतील ऊस जळून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शासकीय पातळीवरून या नुकसानीची त्वरीत पाहणी करून पंचनामे करावेत आणि संबंधित शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

महावितरणच्या निष्क्रिय कारभारामुळे हा प्रकार घडल्याचेही त्यांनी नमूद केले. अनेक ठिकाणी तारा जीर्ण झाल्या असल्याने स्पार्किंग होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.   यावेळी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, संचालक शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे, अवसरीचे सरपंच संदेश शिंदे, भाटनिमगावगावचे सरपंच अजित  खबाले, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय शिर्के, आदित्य शिंदे, अंकुश जाधव, दत्तात्रय मगर, पोपट गायकवाड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version