जेजूरी : प्रतिनिधी
पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांची बारामतीत बदली झाल्यामुळे रिक्त झालेल्या जेजूरी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी अखेर उमेश तावसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी याबद्दलचे आदेश दिले आहेत.
बारामती शहर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांचा एका गंभीर प्रकरणात सहभाग आढळल्याने त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी जेजूरीचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जेजूरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकपद रिक्त होते. या रिक्त जागी उमेश तावसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक तावसकर यांनी यापूर्वी शिक्रापूर पोलिस ठाण्यासह जिल्हा पोलिस दलाच्या सायबर सेलमध्येही काम पाहिले आहे. शिक्रापूरमध्ये त्यांनी अवैध धंद्यांवर धडक कारवाई केली होती. त्याचबरोबर या परिसरात चालणारा राजकीय हस्तक्षेप थांबवत गुन्हेगारांवर वचक निर्माण केला होता.