Site icon Aapli Baramati News

३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारीदरम्यान होणार म्हाडाची सरळसेवा भरती परीक्षा

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

म्हाडाच्या सरळसेवा भरतीमध्ये तांत्रिक अतांत्रिक संवर्गातील ५६५ पदे भरण्यात येणार आहे. त्यासाठी ३१ जानेवारी, १,२,३,७,८,९ फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.

राज्यात विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हाडाच्या परीक्षांकरिता उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे  म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी म्हटले आहे. 

परिक्षांबाबत अपडेट मिळवण्याकरता उमेदवारांनी  म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळास नियमितपणे भेट द्यावी. ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी म्हाडाच्या (https.mhada.gov. in) या संकेतस्थळावर २२ जानेवारी २०२२ पासून https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/31659/75245/login.html ही लिंक उपलब्ध केलेली आहे.  

ऑनलाइन परीक्षा प्रक्रिया सोयीची ठरण्यासाठी म्हाडाच्या संकेतस्थळावर २६ जानेवारीपासून मॉक लिंक उपलब्ध करुन देण्यात आली असल्याने परिक्षेचे साधारण स्वरूप उमेदवार समजू शकतील.(https://g06.tcsion.com:443//OnlineAssessment/index.html?31659@@M211 )

परीक्षा दिल्यानंतर सर्व उमेदवारांना म्हाडा प्रशासनातर्फे एक लिंक उपलब्ध करून दिली जाणार असून, या लिंकवर उमेदवारांना त्यांचा पेपर उत्तरासह पाहता येणार आहे. परीक्षेनंतर प्रश्नपत्रिका व उत्तर तालिका बाबत काही आक्षेप असतील तर आक्षेप नोंदविण्याकरिता उमेदवारांना तीन दिवसांचा कालावधी दिला जाणार असून आक्षेपांबाबत निर्णय झाल्यानंतर, ज्या क्लस्टरकरिता एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा घेतली गेली आहे, त्या क्लस्टरकरिता नॉर्मालिसेशन प्रोसेस (https://www.mhada.gov.in/sites/default/files/Notification_for_Normalisation_MHADA_Recruitment_2021-dtd-14-1-2022.pdf) पूर्ण करण्यात येईल, अशी माहितीही सागर यांनी दिलेली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version