Site icon Aapli Baramati News

हिम्मत असेल तर विधानसभा अध्यक्षांची निवड गुप्त मतदान पद्धतीने करा : चंद्रकांत पाटील यांचे आव्हान

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

गुप्त मतदान पद्धतीने निवडणुका घेतल्यास काय परिणाम होतो, हे अकोला आणि नागपूर परिषदेच्या निकालावरून समोर आले आहे. त्यामुळे आता जर राज्य सरकारमध्ये हिम्मत असेल तर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेऊन दाखवावी, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

विधानपरिषदेच्या निकालानंतर पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला आव्हान दिळे. विधानपरिषदेच्या निकालानंतर विरोधकांचे नाचता येईना अंगण वाकडे अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे ते पराभवाचे काहीही कारण देतील. मुळात नागपूरच्या जागेवर काँग्रेसचा पराभव ठरलेला होता. तरीही निवडणुकीत काँग्रेसने पोरखेळ केला. मात्र या निवडणुकीनिमित्त काँग्रेसमधील मंत्री असलेले सुनील केदार आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात असलेली स्पर्धा आणि मतभेद उघड झाल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

विधानपरिषदेच्या सहा पैकी चार जागा भाजपने जिंकल्या. मुळात या निवडणुका बिनविरोध व्हायला हव्या होत्या. बिनविरोध निवडणुकीमुळे निवडणूक यंत्रणेवर ताण पडला नसता. परंतु काँग्रेसच्या हट्टामुळे निवडणुका झाल्या. तरीही नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळे आणि अकोल्यातून वसंत खंडेलवाल यांनी विजय प्राप्त केला.  गुप्त पद्धतीने मतदान झाले तर निकाल काय लागतो हे या निवडणुकीत  सगळ्यांनी पाहिले असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version