Site icon Aapli Baramati News

हिजाब हा मुस्लिम समाजाचा अधिकारच : एकनाथ खडसे

ह्याचा प्रसार करा

भुसावळ : प्रतिनिधी

कर्नाटक राज्य सरकारने मुस्लिम विद्यार्थिनींना महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यास बंदी घातली आहे. यावरून धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. या निर्णयाचे पडसाद सर्वत्र उमटू लागले आहेत. महाराष्ट्रात बीड, मालेगाव, सोलापूरमध्ये निदर्शने करण्यात आली. या प्रकरणाचे राजकीय पडसाद देखील उमटत आहेत. हिजाब हा मुस्लिम समाजाचा अधिकारच आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. 

भुसावळ शहरातील आरपीडी रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर बुधवारपासून स्व. निखील खडसे स्मृती चषकचा एकनाथ खडसे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. एकनाथ खडसे म्हणाले, कर्नाटक राज्य सरकारच्या निर्णयाचे पडसाद देशभर उमटले लागले आहेत. समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. कर्नाटक राज्य सरकारचा निर्णय चुकीचे असल्याचे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. 

या निर्णयाविरोधात न्यायालयात अपील करण्यात आले आहे. मात्र भावनेच्या आधारावर कुठलाही निर्णय दिला जात नाही. घटनेच्या आधारे निर्णय दिला जाईल,असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. परंतु न्यायालयाने निर्णय देण्या अगोदरच समाजामध्ये तेढ निर्माण झाला आहे.  त्यामुळे कर्नाटक राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय चुकीचा असून या निर्णयामुळे समाजात द्वेष पसरत असल्याची भावना एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version