Site icon Aapli Baramati News

सीए परीक्षेत अपयश; गळफास घेत तिने संपवली स्वतःची जीवनयात्रा..!

ह्याचा प्रसार करा

पिंपरी : प्रतिनिधी

यश म्हणजे सर्व काही अशी भावना तरुणाईची झाली आहे.त्यांना अपयश आले कि ते टोकाचे पाऊल उचलतात. अशीच एक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. सीएच्या परीक्षेत अपयश आल्याने तरुणीने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पल्लवी संजय जाधव (वय २४ वर्षे, रा. केशवनगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पल्लवी ही सीएच्या परीक्षेची तयारी करत होती. तिने या अगोदर दोन वेळा परीक्षा दिली होती.नुकताच सीएच्या परीक्षेचा निकाल लागला. यादेखील परीक्षेत  ती नापास झाली होती. 

निकाल जाहीर झाल्यापासून तिने घरच्यांसोबत संवाद तोडला होता. काल सकाळी तिने केबलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पल्लवीच्या या टोकाच्या पावलामुळे कुटुंबियांना आणि नातेवाईकांना धक्का बसला आहे. तिच्या नातेवाईकांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचे पोलीसांना सांगितले आहे. 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version