Site icon Aapli Baramati News

संजय राऊत यांनी पाठवली चंद्रकांत पाटील यांना नोटीस; माफी न मागितल्यास दिला कारवाईचा इशारा

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबीयांना मिळाल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. यामध्ये त्यांनी  बिनशर्त माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला  आहे.

चंद्रकांत पाटील यांनी माझी आणि माझ्या पत्नीची बदनामी करणारे बोगस आणि निराधार वक्तव्य केले आहे. त्याबद्दल  त्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या खोट्या आरोपांबद्दल बिनशर्त मागावी, अन्यथा मी पुढील कायदेशीर कारवाई करेल. याबाबत न्यायालयात दाद मागितली जाईल, असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना एक पत्र लिहीले होते. तुम्हाला ईडीचा अनुभव कधीपासून आला. मला ईडीचा अनुभव नाही. त्यासाठी भरपूर काळा पैसा मिळावावा लागतो. तुमच्या पत्नीने पीएमसी बँक घोटाळ्यातील पन्नास लाख रुपये मिळवले. मात्र यावर तुम्हाला ईडीकडून नोटीस बजावण्यात आल्यावर तुम्ही हैराण झाले. शेवटी बरीच धावपळ करून तुम्ही पैसे परत करून प्रकरण दाबले, असे चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले होते.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version