Site icon Aapli Baramati News

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या धमक्यांना घाबरत नाही : किरीट सोमय्या

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आता थेट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं आहे.  किरीट सोमय्या यांनी ट्विट करत आम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या धमक्यांना घाबरत नाही.  धमकी कोणाला ? असा थेट इशारा दिला आहे. घोटाळेबाजांना महाराष्ट्रातील जनता सजा देणारच असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे. 

किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटले आहे की , आम्ही शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या धमक्यांना घाबरत नाही. धमक्या कोणाला ? सुप्रिम कोर्टला, हायकोर्टला, ईडीला, भाजपाला की किरीट सोमय्यांना ? असा सवाल किरीट सोमय्या यांनी ट्विट मधून उपस्थित केला आहे.

फक्त अनिल देशमुखच नाहीतर जितेंद्र आव्हाड यांनादेखील अटक झाली आहे. महाराष्ट्रातील जनता घोटाळेबाजांना सजा देणारच, असा इशारा त्यांनी दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत केंद्रीय तपास यंत्रणेकडे तक्रारी केल्या आहेत. 

अगोदरच राज्यात केंद्रीय तपास यंत्रणेकडून विकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांच्या चौकश्या चालू आहेत. अशातच किरीट सोमय्या यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. त्यामुळे सोमय्या यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version