मुंबई : प्रतिनिधी
जगभर ओमिक्रॉन व्हेरियंट वेगाने पसरतो आणि वेगाने पसरणाऱ्या कोरोनाविषाणूच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र सरकार सुद्धा सतर्क झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळाची तातडीची बैठक पार पडली. प्रश्न फक्त शाळा पुरता मर्यादित नाहीये तो विविधांगी असणारे आणि त्यामुळे नेमक्या कोणत्या उपाययोजना करायच्या यासाठी ही बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. अजित पवार, वळसे-पाटील या बैठकीतून बाहेर आलेले आहेत. तर मुख्यमंत्रीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत ओमिक्रॉन व्हेरियंटच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
आज झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये एकंदरीत नवीन आलेला आहे दक्षिण आफ्रिकेतील ओमिक्रॉन व्हेरियंटचा ज्या पद्धतीने त्या ठिकाणी परिणाम आढळुन आलाय. त्यावर आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आणि तो व्हेरियंट किती घातक आहे. या विषयासंदर्भात देखील माहिती देण्यात आली.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भामध्ये इतर मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांना आणि मुख्यमंत्र्यांनाही ही माहिती दिली. तसेच नवीन नियमावली जी आहे ती लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे ही सांगितले असुन आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी काही निर्बंध लादले जातील याविषयी देखील आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.