Site icon Aapli Baramati News

रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला; आमदार चंद्रकांत पाटील करणार विधानसभेत मुद्दा उपस्थित

ह्याचा प्रसार करा

मुक्ताईनगर : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर काही अज्ञातांनी सोमवारी रात्री (दि.२७) हल्ला केला आहे. या घटनेनंतर हल्ल्याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. अशातच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत विधानसभेत याप्रकरणी मुद्दा उपस्थित करून हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, रोहिणी खडसे यांच्या वाहनावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. मुक्ताईनगरमध्ये त्या चांगल्या प्रकारे काम करत आहेत. या हल्ल्याचा मुद्दा मी विधानसभेत उपस्थित करणार आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी  करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, सोमवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात हल्लेखोरांनी रोहिणी खडसे यांच्या वाहनावर दगडफेक केली. तसेच लोखंडी रॉडच्या सहाय्याने हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे,अशी माहिती जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी दिली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version