आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणेमहानगरेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड

पुणे
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

गेल्या काही महिन्यांपासून  रिक्त असलेल्या राज्य  महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांची निवड झाली आहे. याबाबत राज्य शासनाकडून अधिसूचना काढण्यात आली असून; रूपाली चाकणकर यांच्या नावाची अधिकृतरीत्या घोषणा करण्यात आलेली आहे. आज रूपाली चाकणकर या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. ४ फेब्रुवारी २०२० रोजी विजया रहाटकर यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते. 

गेल्या  काही दिवसांपासून पद रिक्त असल्यामुळे भाजपाकडून वेळोवेळी राज्य सरकारवर टीका करण्यात येत होती. गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला सुरक्षेच्याबाबत भाजपने राज्य सरकारला धारेवर धरलं होतं. भाजपाकडून राज्य सरकारवर वेळोवेळी हल्लाबोल चढवला जात होता. 

महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त असल्यामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी वेळोवेळी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. अशातच अखेर राज्य सरकारने रूपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची अधिकृतरित्या घोषणा केली आहे. 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या रूपाली चाकणकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी पक्षाकडून नियुक्ती करण्यात आली होती.

रूपाली चाकणकर यांनी आपले काम जोमाने करत पक्षात वेगळी छाप निर्माण केली आहे. भाजपला वेळोवेळी महिलांच्या प्रश्नाबाबत धारेवर धरत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करून राज्य सरकारने अखेर त्यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.


ह्याचा प्रसार करा
पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us