Site icon Aapli Baramati News

राष्ट्रवादीच्या आजी – माजी आमदारांची बैठक बुधवारी; शरद पवार घेणार मतदारसंघाचा आढावा

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी 

२०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढून विजयी झालेले व पराभूत झालेल्या उमेदवारांची महत्वपूर्ण बैठक बुधवारी (दि. ८ सप्टेंबर) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसचे मुख्य प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. यापूर्वीच ही बैठक पार पडणार होती. मात्र शरद पवार यांच्या तब्येतीमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती.

बुधवार दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ही बैठक होणार आहे. ही बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित होती. मात्र त्यांच्या तब्येतीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता ही बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीत विजयी व पराभूत झालेल्या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

दरम्यान,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत येत्या निवडणुकांची रणनीती आखण्याबरोबरच महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणुकीला सामोरे जाण्याबाबत विचार विनीमय केला जाण्याची शक्यता आहे.  


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version