Site icon Aapli Baramati News

राज्य शासनाने घेतला सातबारा उतारा बंद करण्याचा निर्णय

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारे आरसाच होय. शेत जमिनीशी निगडित महत्त्वाच्या गोष्टींची माहिती या उताऱ्यावर दिलेली असते. परंतु आता सातबारा उतारा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.त्याजागी ‘प्रॉपर्टी कार्ड’ सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अलीकडच्या काळात शहरीकरण वाढत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे बऱ्याच ठिकाणी शेतजमीन शिल्लक नाही. त्यामुळे या शहरांमधील सातबारा उतारा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्याची जागा आता प्रॉपर्टी कार्डने घेतली आहे.  काही जण करांपासून वाचण्यासाठी आणि इतर लाभांसाठी सातबारा उतारा वापरतात. त्यामुळे फसवणुकीचे प्रकार या शहरांमध्ये घडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भूमि अभिलेख विभागाकडून ज्या शहरांमध्ये सिटीसर्वे झाले आहेत आणि सातबारा उतारा देखील सुरू आहे अशा शहरांमध्ये सातबारा उतारा बंद करण्याचा त्याठिकाणी  निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यातील हवेली तालुक्यासोबतच सांगली, मिरज आणि नाशिकपासून या निर्णयाची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तो राज्यभरात राबवण्यात येणार आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version