Site icon Aapli Baramati News

म्हाडा भरतीच्या विद्यार्थ्यांना मिळणार परीक्षा शुल्क माघारी; जितेंद्र आव्हाड यांची मोठी घोषणा

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

म्हाडा भरतीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्क परत मिळणार आहे. येत्या दोन दिवसांत याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्री जितेन्द्र आव्हाड यांनी दिली आहे.

५६५ पदासाठी राज्यातील १ लाख २ हजार ४०० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. १२,१५,१९ आणि २० डिसेंबर दरम्यान दोन सत्रामध्ये परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर गेल्यावर विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द झाल्याचे समजले. त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागला.

या सर्व प्रकारामुळे विद्यार्थी आणि विरोधी पक्षांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. त्यामुळे परीक्षा शुल्क परत घेण्याचा निर्णय जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केला आहे. ही परीक्षा आता म्हाडा आयोजित करणार असल्याचे सांगितले. मात्र, यासाठी आता टीसीएस या कंपनीची निवड करण्यात येणार आहे.

आता केवळ पहिल्या दिवशी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला असून येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय घेतला जाईल, असे म्हाडाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version