पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामध्ये विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात आणि माजी उपाध्यक्ष दत्तात्रय येळे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात, माजी उपाध्यक्ष दत्तात्रय येळे यांची बिनविरोध निवड झाली. तत्पूर्वी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आप्पासाहेब जगदाळे, संभाजी होळकर यांची बिनविरोध निवड झाली.
अर्ज माघारी घेण्यासाठी वेळ शिल्लक असतानाच रमेश थोरात यांच्यासह माजी उपाध्यक्ष दत्तात्रय येळे यांचीही बिनविरोध निवड झाली. पुणे जिल्हा बँकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकहाती सत्ता आहे. या निवडणुकीत अजित पवार यांच्यासह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार संजय जगताप, संग्राम थोपटे, रेवणनाथ दारवटकर, ज्ञानोबा दाभाडे आणि प्रवीण शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून त्यामध्ये किती अर्ज राहतात की निवडणूक बिनविरोध होते याकडेच लक्ष लागले आहे.