Site icon Aapli Baramati News

मोठी बातमी : परमबीर सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाई; रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी  

राज्य सरकारकडून  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना जबरदस्त धक्का देत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्यांनी परमवीर सिंग यांच्या निलंबनाच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. परमबीर सिंग यांनी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप केला होता.

देवाशिष चक्रवर्ती समितीच्या अहवालानुसार परमबीर सिंग यांनी भारतीय पोलीस सेवेतील नियमांचे उल्लंघन केलेले आहे. सोबतच त्यांच्यावर एका महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी असताना सुद्धा ते सेवेवर वेळेत रुजू झाले नाहीत असे म्हंटले आहे.  तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता तब्बल २३४ दिवस फरार होते. अनियमितता आणि बेशिस्तपणा यामुळे परमबीर सिंग यांच्यावर सेवेतून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

देबाशिष चक्रवर्ती यांनी मुख्य सचिवपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर परमवीर सिंग यांच्या निलंबनाची कारवाईची फाईल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केली. परमवीर सिंग यांच्यासंबंधी सादर केलेला अहवाल स्वीकारत उद्धव ठाकरे यांनी त्या फाईलवर सही करून परमबीर सिंग यांना सेवेतून निवृत्त केले आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्र पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यावर सेवेतून निलंबित करण्याची वेळ आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version