Site icon Aapli Baramati News

मोठी बातमी : ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊत यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल

ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात दिल्लीतील मंडावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मुलाखतीत खासदार संजय राऊत यांनी भाजप कार्यकर्त्यांवर आक्षेपार्ह शब्द वापरत टीका केली केली होती. त्यामुळे भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सरचिटणीस दीप्ती रावत भारद्वाज यांनी मंडावली  पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा अपमान होत असल्याचा आरोप दीप्ती रावत यांनी केला आहे. त्यांनी या तक्रारीसोबत संजय राऊत यांच्या त्या मुलाखतीची प्रतही पोलिसांना देण्यात आली होती.  त्यानुसार मंडावली पोलिसांनी रविवारी कलम ५०० आणि ५०९ नुसार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

गुरुवारी दीप्ती रावत या एक मराठी वृत्तवाहिनी पाहत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मुलाखत सुरू होती.  या मुलाखतीदरम्यान संजय राऊत यांनी उघडपणे भाजप कार्यकर्त्यांवर अशोभनीय टिप्पणी केली.  मुलाखत पाहून त्यांच्या भावना दुखावल्याचे सांगत दीप्ती रावत यांनी मंडावली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिल्याचे सांगण्यात आले.

यासंदर्भात संजय राऊत म्हणाले की, माझ्याविरोधात राजकीय हेतू पूर्ण करण्यासाठी आणि माझा आवाज दाबण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  माझ्या विरोधात सीबीआय, आयटी, ईडीसारख्या संस्थांचा वापर केला जाऊ शकत नाही. त्यामुळे माझ्या पक्षाची प्रतिमा खराब करण्यासाठी हे केले गेले आहे.  मी खासदार आहे आणि माझ्याविरुद्ध चुकीची तक्रार करण्यासाठी कोणालाही प्रोत्साहन देणे योग्य नाही.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version