Site icon Aapli Baramati News

मोठी बातमी : इंदापूरची लेक होणार ठाकरे कुटुंबाची सून..!

ह्याचा प्रसार करा

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या तथा पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील या ठाकरे कुटुंबात सून म्हणून प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बंधू दिवंगत बिंदुमाधव ठाकरे यांचे पुत्र नामवंत वकील निहार ठाकरे यांच्याशी त्या विवाहबद्ध होत आहेत.

पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील या येत्या २८ डिसेंबर रोजी मुंबईत विवाहबद्ध होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे ॲड. निहार बिंदुमाधव ठाकरे यांच्याशी त्यांचा विवाह होत आहे. या पार्श्वभूमीवर अंकिता पाटील यांनी आपले वडील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत आज मुंबईत विविध मान्यवरांच्या भेटी घेत निमंत्रण दिले.

मागील काही दिवसांपासून अंकिता पाटील या ठाकरे कुटुंबाच्या सून होत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र याबाबत प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली होती. आज निमंत्रण देण्याच्या निमित्ताने विविध मान्यवरांच्या या पिता-पुत्रीने भेट घेतली. त्यानंतर इंदापूरची लेक ठाकरे कुटुंबाची सून होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version