Site icon Aapli Baramati News

मोठी बातमी : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची बाधा; घरीच सुरू केले उपचार

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

मागील काही महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. अशातच प्रसिद्ध अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी घरीच उपचार सुरू केले असून संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनाची बाधा झाल्याबद्दल उर्मिला मातोंडकर यांनी आज सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली.

त्यांनी स्वतःला राहत्या घरात क्वारंटाईन करून घेतले असून दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वांनी स्वतःची काळजी घेण्याचे  आवाहन केले आहे.

‘मी कोरोना पॉझिटीव्ह आहे. मी ठिक असून राहत्या घरी क्वारंटाईन आहे. मी स्वतःला आयसोलेट करून घेतलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी प्रत्येकाने कोरोना चाचणी करा…’  अशी माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. तसेच दिवाळीचा काळ असून प्रत्येकाने स्वत:ची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version