Site icon Aapli Baramati News

मुंबई उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या विरोधातील याचिका फेटाळली

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते राजेश कुंटे यांनी  काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांकडून करण्यात आली होती, असे भाष्य राहुल गांधी यांनी केले होते. त्याविरोधात कुंटे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

राहुल गांधी यांनी भिवंडीमध्ये मार्च २०१४ मध्ये निवडणुक प्रचारादरम्यान महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांकडून करण्यात आली आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येसाठी  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कारणीभूत आहे, असे भाष्य केले होते. कुंटे यांनी गांधी यांच्या या वक्तव्याविरोधात तक्रार दाखल करत एफआयआर नोंदवला होता.

यानंतर राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात धाव घेत; आपण केलेल्या भाषणाचा विपर्यास केला जात आहे असे म्हटले होते. यासंबंधी भाषणाची प्रत देखील त्यांनी न्यायालयात सादर केली होती. परंतु या भाषणाची प्रत दाखल करत गांधींनी स्वतः केलेल्या विधानाला पृष्टी दिली आहे, असा दावा कुंटे यांनी केला होता.

२०१८ मध्ये भिवंडी येथील न्यायालयाने भाषण हाच  पुरावा ग्राह्य धरण्याची कुंटे यांनी केलेली मागणी फेटाळली होती. त्यानंतर कुंटे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत पुन्हा याच मागणीची याचिका दाखल केली होती. परंतु तेथे ही याचिका रद्द करण्यात आली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version