Site icon Aapli Baramati News

महिला सुरक्षिततेसाठी पुणे शहर पोलिसांचे पाऊल; शहरात विविध उपक्रम पूर्ववत सुरू

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेसाठी बंद असलेले पोलीस काका, पोलीस दीदी, बडीकॉप असे उपक्रम पुन्हा चालू करण्याचे आदेश शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत. शहरातील सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची गस्त राहावी, यासाठी हे उपक्रम पूर्ववत सुरू करण्यात आलेत.

शहरात गेल्या काही दिवसात एकामागे एक अशा बऱ्याच महिला अत्याचाराच्या घटना घडल्या होत्या.  त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर काल पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पदाधिकऱ्यांसोबत बैठक बोलवली होती. महिला सुरक्षेसाठी शहरातील सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी पोलिसांच्या गस्त वाढण्यासाठी बंद असलेले काही उपक्रम  पुन्हा चालू करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे पोलीस काका, पोलीस दीदी हे उपक्रम बंद होते. पण आता पुन्हा शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे हे उपक्रम पुन्हा एकदा कार्यान्वित होणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांना समुपदेशन केले जाईल. आयटीमध्ये काम  करणाऱ्या महिलांच्या प्रश्न सोडविण्यासाठी  बडीकॉप हा उपक्रम पुन्हा चालू होणार आहे . या उपक्रमात पूर्वी महीला व पोलीस  यांचा सहभाग असलेले ४०० ते ५०० व्हॉटसअप ग्रुप होते. आता त्यात वाढ करण्यात येणार आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version