Site icon Aapli Baramati News

महाविकास आघाडी सरकारचे स्टेअरिंग ठाकरेंच्या हातात असल्यामुळे भाजपला पोटदुखीचा त्रास : संजय राऊत

ह्याचा प्रसार करा

पणजी : वृत्तसंस्था

महाराष्ट्राला कितीही झुकवण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्र झुकणार नाही. महाविकास आघाडी सरकारचे स्टेअरिंग ठाकरेंच्या हातात आहे आणि यापुढेही राहील. ठाकरेंच्या हातातलं स्टेअरिंग पाहून भाजपला पोटदुखीचा त्रास होतोय, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एकत्रित विकास कामांची पाहणी केली. कामाची पाहणी करण्यासाठी या दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केला. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी स्वतः गाडी चालवली. त्याकडे संजय राऊत यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी भाजपला हा इशारा दिला. भाजपची ही कळ आहे. आघाडीचे नेते एकत्र आले की भाजपच्या पोटात वेगवेगळ्या प्रकारची कळ येते. धमक्या देऊन दहशतीचे राजकारण करून आघाडी सरकारला तडा जाणार नाही. सरकारचे स्टेरिंग हे ठाकरेंच्या हाती आहे आणि यापुढेही राहील, असे राऊत म्हणाले.

भाजप नेते मोहित कंबोज यांनी त्यांना महापालिकेची निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान दिले होते. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. संजय राऊतांनी कुणाला उत्तर द्यावं कुणाला नाही, हा प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. मी उत्तर दिलं तर माणूस मोठा होतो, असा टोला राऊत यांनी लगावला.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version