Site icon Aapli Baramati News

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी पद्धतीने होणार; नियम समितीच्या बैठकीत निर्णय

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीऐवजी आवाजी पद्धतीने होणार आहे. बुधवारी झालेल्या नियम समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आगामी हिवाळी अधिवेशनात सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर या नियमाची अंमलबजावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक मतदान पद्धतीने होत असते. परंतु काही राज्यांमध्ये ही निवडणूक आवाजी पद्धतीने होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फेब्रुवारी महिन्यात अध्यक्षपदाच्या दिलेल्या राजीनाम्यामुळे ते पद आत्तापर्यंत रिक्त आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र पावसाळी अधिवेशन उलटून गेल्यानंतरही अध्यक्षपदाची निवडणूक झाली नाही. आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळेच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी पद्धतीने घेण्याचा निर्णय झाला असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, गुप्त पद्धतीने मतदान घेतल्यास मते फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक आवाजी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सत्ताधाऱ्यांनी गेल्या अनेक वर्षापासूनचा गुप्त पद्धतीने मतदानाचा नियम बदलला आहे. मते फुटण्याच्या भीतीमुळेच हा निर्णय घेतला असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version