Site icon Aapli Baramati News

भाजपने मला १०० कोटी रुपयांची ऑफर दिली होती : शशिकांत शिंदे यांचा गंभीर आरोप

ह्याचा प्रसार करा

सातारा : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपामध्ये यावे यासाठी भारतीय जनता पार्टीकडून मला १०० कोटी रुपयांची ऑफर दिली होती असा गंभीर आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. मात्र मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. हे त्यांना माहिती होते. जरी मी मेलो तरीसुद्धा शरद पवार यांना कधीच सोडून जाणार नाही असेही शिंदे यांनी म्हटले आहे. 

कट्टापूर येथे शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला शशिकांत शिंदे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. 

माझ्यावर भाजपाचे प्रचंड प्रेम होते. आजही भाजपाचे  तेवढ्याच प्रमाणात प्रेम आहे.आता मला वाटते त्यावेळी देत असलेले 100 कोटी रुपये घेतले असते तर बरे झाले असते. परंतु त्यांना माहिती होते की, मी शरद पवार यांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मेलो तरी शरद पवार यांना सोडणार नसल्याचे शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. 

शिंदे यांनी यावेळी केंद्रीय तपास यंत्रणेच्या कारवाईवरही  वक्तव्य केले आहे. आमच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्तेच भाजपसह ईडी-सीडी यांना पळवून लावतील. आपण आयकर विभाग आणि इडीच्या बापालाही घाबरत नसल्याचेही शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या हे येथे आले होते. त्यावेळी मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना किरीट सोमय्या यांचा तोतरेपणा बंद करण्याची परवानगी मागितली होती. मात्र त्यांनी शांत बसण्यास सांगितले. आपण असल्या परिणामांचा विचार करत नाही, असेही त्यांनी सांगितले. 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version