Site icon Aapli Baramati News

भाजपच्या १२ महिला आमदारांनी दिले मुख्यमंत्र्यांना पत्र

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

 भाजपच्या १२ महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. सावित्रीच्या लेकींचे गार्‍हाणे मातोश्री एकणार  का? असा सवाल या पत्रात करण्यात आला. राज्यामध्ये महिला असुरक्षित असताना दिल्लीमध्ये अधिवेशन बोलावण्याची मागणी करून राज्याची अब्रू दिल्लीच्या वेशीवर का टांगता, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

राज्यपालांनी राज्यांमध्ये दोन दिवसांचे अधिवेशन आयोजित करण्याची सुचना मुख्यमंत्र्यांना केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना जे उत्तर दिलं त्यावरुन भाजपच्या या महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र पाठवले आहे. तसेच या महिला आमदारांनी राज्यपालांचीही भेट घेतली होती. माधुरी मिसाळ, विद्या ठाकूर, देवयानी फरांदे, मनिषा चौधरी , सीमा हिरे, श्वेता महाले पाटील,  मेघना साकोरे बोर्डीकर, डॉ. नमिता मुंदडा, मंदा म्हात्रे, भारती लव्हेकर, मोनिका राजळे, मुक्ता टिळक या महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे.

कोरोना विषाणूंमुळे सर्वांचे जिवन विस्कळीत झाले होते. मात्र , आता कुठे ते पूर्वपदावर येत आहे. राज्यातील महिलांच्या सन्मानाबद्दल आपण नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श पुढे ठेवत असतो. महाराष्ट्राच्या स्त्री सन्मानाचा इतिहास आज खुंटीवर ठेवल्याच्या भावनेने आम्ही नाराज आहोत.  गुन्हेगारीशी तुलना करून महाराष्ट्रातील गुन्हेगारी आणि महिलांवरील पाशवी अत्याचारांचे समर्थन होऊ शकणार नाही. यावर सरकारने विचार करायला हवा, असे ही या पत्रात नमूद केले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version