Site icon Aapli Baramati News

पतंग कधी कापायचा हे आम्हाला माहिती आहे : संजय राऊत यांचं भाजपला प्रत्युत्तर

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी  

कोणीतरी तिकडे आहे . त्यांना आमच्याकडे यायचे आहे. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री  उध्दव ठाकरे यांनी संकेत दिले आहेत. आजी – माजी एकत्र झाले तर भावी सहकारी, या वक्तव्याचा अर्थ स्पष्ट करत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘सरकार कोसळेल या भ्रमात कोणीच राहू नका. असा पतंग जर कोणी उडवत असेल तर उडवू द्या. तो पतंग कसा आणि कधी कापायचा हे आम्हाला माहिती आहे’, असे  राऊत यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांची बोलण्याची एक शैली आहे.  त्यांनी बोलण्यामध्ये आम्ही सरकारमधून बाहेर पडू आणि नवीन आघाडी तयार होईल, असा उल्लेख कोठेच केलेला नाही. ज्यांना कोणाला आमच्यासोबत भावी सहकारी होण्याची इच्छा असेल, ते  आमच्याकडे येऊ शकतात.   असे ते म्हणले आहेत. राज्याच्या राजकारणामध्ये ज्या घडामोडी चालू आहेत. त्याचा संबंध  चंद्रकांत पाटलांच्या आम्हाला माजी म्हणू नका या विधानाशी आहे, असे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले.

उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी ( ता.१७)  औरंगाबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात ‘आजी-माजी एकत्र आलो तर , भावी सहकारी असू’ या केलेल्या वक्तव्यावर संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळात  पुन्हा सेना-भाजप युतीची एकाच खळबळ उडाली होती. त्यावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सरकार पाच वर्षे टिकणार आहे. पाच वर्षे सरकार चालवण्याची वचनबद्धता आहे. शिवसेना दिलेल्या शब्दाला जागते. शिवसेना पाठीत खंजीर खुपसत नाही; शिवसेना विश्वासघात करत नाही, असे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version