Site icon Aapli Baramati News

निवडणूक आयोगाचा निर्णय : राज्यसभेच्या निवडणुकीत ‘त्या’ १२ निलंबित आमदारांना करता येणार मतदान

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ४ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी भाजपच्या १२ निलंबित आमदारांनाही मतदान करता येईल असा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे या निलंबित आमदारांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

जुलैमध्ये विधानसभेचे अधिवेशन चालू असताना तालिका अध्यक्षांना धक्का बुक्की, शिवीगाळ व इतर गैरवर्तणूकप्रकरणी भाजपाच्या  बारा आमदारांना  एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. अद्याप त्यांच्या निलंबनाची एक वर्ष पूर्ण झालेले नाही. त्यामुळे त्यांना या राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करता येईल का असा प्रश्‍न सर्वांसमोर उभा राहिला होता.

दरम्यान , राजीव सातव यांच्या निधनाने राज्यातील राज्यसभेची  त्यांची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोट निवडणूक घेण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर,  केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे . त्यामध्ये निलंबित केलेल्या आमदारांना या निवडणुकीसाठी मतदान करता येईल, असे सांगण्यात आले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version