Site icon Aapli Baramati News

धक्कादायक.. हत्या प्रकरणातील आरोपींकडून पोलिसांवर गोळीबार; पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश जखमी

ह्याचा प्रसार करा

पिंपरी : प्रतिनिधी

चाकणजवळील कुरळी गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपळे गुरवमधील भरचौकात झालेल्या हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामध्ये पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश हेही जखमी झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल तीन राऊंड फायर केले.

याबाबत माहिती अशी की, योगेश रवींद्र जगताप (वय ३६, रा. पिंपळे गुरव) याचा दि. १८ डिसेंबर रोजी पिंपळे गुरव येथील भरचौकात गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना अटक करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची चार पथके चाकणनजीकच्या कुरळी गावात रवाना झाली होती.

पोलिस आल्याचे समजल्यानंतर दबा धरून बसलेल्या आरोपींनी पोलिसांवरच गोळीबार केला. पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश हेही या पथकासोबत होते. त्यांनाही किरकोळ इजा झाल्याची माहिती पुढे येत आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान,  या प्रकरणानंतर पोलिसांनी काहीजणांना ताब्यात घेतल्याचे समजते.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version