आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महानगरेमहाराष्ट्र

धक्कादायक : सैराटची पुनरावृत्ती; प्रेमविवाह केल्याने बहिणीचे मुंडके छाटून केली हत्या

महानगरे
ह्याचा प्रसार करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात लाडगाव शिवारात धक्कादायक घटना घडली आहे. मोठ्या बहिणीने प्रेमविवाह केल्याने संतापलेल्या लहान भावाने बहिणीचे मुंडके छाटत निर्घुणपणे हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेदरम्यान मुलीच्या नवऱ्याने तेथून पळ काढल्याने त्याचा जीव वाचला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

वैजापूर तालुक्यात सैराटपेक्षाही भयानक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांपूर्वी मयत किशोरी मोटे हिने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन आळंदी येथे स्वमर्जीने प्रेम विवाह केला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी किशोरी तिच्या पतीसोबत लाडगाव शिवारात राहण्यास आली. 

किशोरी त्याच्या पतीसोबत लाडगाव शिवारात राहण्यास आल्याची माहिती त्या भावाला मिळाली. ही माहिती मिळताच भावाने आपल्या आईला सोबत घेऊन लाडगाव गाठले. बहिणीला पाहून राग अनावर न झाल्याने संतापलेल्या भावाने सख्या बहिणीची धडापासून मुंडके वेगळे करत गंभीर हत्या केली आहे.

या घटनेमुळे घाबरलेल्या पतीने तेथून पळ काढला. त्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आरोपी भावाला आणि त्याच्या आईला अटक केली आहे. 


ह्याचा प्रसार करा
महानगरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us