Site icon Aapli Baramati News

धक्कादायक : चित्रपटात काम करण्याचं स्वप्न भंगलं; फलटणच्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

ह्याचा प्रसार करा

फलटण : प्रतिनिधी

चित्रपटात काम करण्याचं स्वप्न भंग झाल्यामुळे एका तरुणाने टोकाचं पाऊल उचलले आहे. अतुल शिंदे या युवकानं विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. फलटण तालुक्यातील गोखळी येथे ही घटना घडली.

अतुल राजेंद्र शिंदे (वय २९)  असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अतुलला चित्रपटात अभिनेता म्हणून काम करण्याची इच्छा होती. तो युट्युबवरील छोट्या वेबसीरिजमध्ये काम करत होता. मात्र घरची परिस्थिती हलाखीची होत. त्यामुळे तो एका गॅरेजमध्ये काम करत होता.

अतुल हा सोशल मीडियावर सक्रिय असायचा. एक ना एक दिवस आपल्याला चित्रपटात काम करण्याची संधी मिळेल आणि गॅरेजमध्ये काम करावे लागणार नाही, असे त्याला मनोमन वाटत असे. मात्र चित्रपटात काम करण्याची संधी मिळत नसल्याने तो निराश असायचा. त्याच नैराश्यातून त्याने विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेने फलटण परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत फलटण पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version