Site icon Aapli Baramati News

दौंड पोलिसांची दारू अड्ड्यावर धडक कारवाई; दारू अड्डे उद्धवस्त

ह्याचा प्रसार करा

दौंड : प्रतिनिधी

दौंड शहर व परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास दौंड पोलिसांनी सुरूवात केली आहे. मलठण, बेटवाडी येथील दारू अड्ड्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील मलठण गावचे हद्दीत ज्योतिबानगर येथे आरोपी सुभाष प्रल्हाद लोंढे (रा. ज्योतिबानगर, मलठण ता. दौंड) येथे हातभट्टीची दारू गाळण्यासाठी बाराशे लिटरचे रसायन दारू तयार करण्याची पट्टी लावण्याचा मोठा बॅरल, एक एचपी इलेक्ट्रिक मोटर, पाच लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू असा एकूण ९ हजार ५०० रुपयांचा माल हातभट्टीची गावठी दारू तयार करण्याची भट्टीवर कारवाई केली आहे.

तसेच बेटवाडी हद्दीतील वंदना जनार्दन भोसले (वय ४६ वर्ष, रा. शिरसाई मळा बेटवाडी), मोहीनी बाजीराव भोसले (रा. शिरसाईमळा, बेटवाडी ता.दौंड) यांच्यावरही हातभट्टी दारू विक्री करीत असताना धाड टाकून कारवाई करण्यात आली आहे.  त्यानुसार त्यांच्यावर भा.द.वि ३२८ , ६५ (ग), महाराष्ट्र दारू बंदी कायदा कलम ६५ (ई) (फ), नुसार कारवाई करण्यात आली असून याबाबत फिर्याद पोलीस नाईक नारायण बबन वलेकर यांनी दिली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राठोड, पीएसआय आबनावे, पीएसआय पालवे, एएसाय शिंदे, विठ्ठल गायकर, विनोद चव्हाण, ज्ञानेश्वर राऊत, श्री. वलेकरं, सतीश हिरवे, सागर गायकवाड, शरद वारे, श्री. वाळके, श्री. मुजावर आदींनी सहभाग घेतला होता.  पुढील तपास सहाय्यक फौजदार शिंदे हे करीत आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version