आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
कृषि जगतमहानगरेमहाराष्ट्रराजकारण

दिवाळीला राज्य शासनाचा काळे झेंडे दाखवून निषेध करणार : राजू शेट्टी

कृषि जगत
ह्याचा प्रसार करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

राज्य शासनाने शेतकऱ्यांना भरघोस मदतीचे आश्वासन दिले. मात्र पुरेशी मदत दिलेली नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांचा केसाने गळा कापला आहे.  त्यामुळे या दिवाळीत शेतकऱ्यांनी राज्य शासनाचा काळे झेंडे दाखवून निषेध करा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची वीसावी ऊस परिषद पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. अतिवृष्टीने मराठवाड्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्य सरकार फक्त मदतीचे आश्वासन देत आहे. मात्र काहीच करत नाही. खरोखरच राज्य शासनाकडे पैसे नव्हते तर त्यांनी  सरकारी नोकरदारांच्या महागाई भत्त्यात ११ टक्के वाढ कशी काय केली ? असाही सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. 

शरद पवार यांनी साताऱ्यामध्ये भर पावसात हे सरकार शेतकऱ्यांच्या असेल असे म्हटले होते. हे तुमचे शब्द आठवण करून द्यायला हवेत, म्हणून मी त्या शब्दांची आठवण करून देत असल्याचेही राजू शेट्टी यांनी नमूद केले. 

मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. सरकार गुंठ्याला १३५ रुपये देणार असल्याचे वारंवार सांगत होतो. त्यात सरकारने फक्त १५ रुपये वाढ करून गुंठ्याला केवळ १५० रुपये मदत दिली आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांना अपेक्षित मदत मिळाली नसल्याचे सांगून एफआरपीचे तुकडे करण्यामध्ये केंद्र शासनाचा हात असल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केला आहे. 

महाविकास आघाडीतील नेत्यांनी शेतकऱ्यांना भरीव मदत करणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्यांनी काहीच केले नाही. तुम्ही आमचा दसऱ्याचा शिमगा केला. त्यामुळे आता आम्ही दिवाळीला तुमचा शिमगा केल्याशिवाय राहणार नाही,असा इशारा शेट्टी यांनी राज्य सरकारला दिला आहे. तसेच राज्य शासनातील मंत्र्यांचे दिवाळीला काळे झेंडे दाखवून स्वागत करा, असे आवाहनही शेट्टी यांनी केले आहे. 


ह्याचा प्रसार करा
कृषि जगत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us