Site icon Aapli Baramati News

दहावी बारावी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची गृह मंत्रालयाकडून होणार चौकशी

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्घतीने घेतली जाणार असल्याचे समजल्यानंतर विद्यार्थ्यांनी या निर्णयाला विरोध करत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोरआंदोलन केलं. या आंदोलनाची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या ठिकाणची  गर्दी नियंत्रणात आणण्याचे आदेशही यावेळी गृहमंत्र्यांनी दिले आहेत. राज्यातील बर्‍याच ठिकाणी विद्यार्थी परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात या मागणीसाठी  रस्त्यावर उतरले आहेत. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे विकास पाठक उर्फ ‘हिंदुस्थानी भाऊ’ चे नाव अनेक आंदोलक विद्यार्थांकडून घेण्यात आले आहे.

हिंदुस्थानी भाऊचा पोलिसांकडून शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून, विद्यार्थ्यांची डोकी भडकवणाऱ्या हिंदुस्थानी भाऊला अटक होणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल. दरम्यान, विद्यार्थ्यांकडून पुणे, नागपूर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जात आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version