आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
अर्थकारणकृषि जगतमहानगरेमहाराष्ट्रराजकारण

…त्यांनी आपले मंत्रिपद भाड्याने दिले आहे : पंकजा मुंडे यांचा टोला

अर्थकारण
ह्याचा प्रसार करा

बीड : प्रतिनिधी

सावरगाव येथील दसरा मेळाव्यात माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले बंधु आणि कट्टर राजकीय विरोधक सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला चढवला आहे. त्यांनी आपली मंत्रिपद भाड्याने दिले आहे असा टोला त्यांनी मुंडेंना लगावला आहे.

बीड जिल्ह्यातील संत भगवानबाबा यांच्या जन्मगावी सावरगाव येथे आज माजी मंत्री भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार आणि कोणाकोणावर तोफा डागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झाले आहे. मात्र  राज्य सरकारचे अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मदतीचे पैसे पोहोचले नाहीत. पालकमंत्र्यांची शेतकऱ्यांना मदतीचे पैसे पोहोचले नाही.  आता त्यांना काही बोललं तर राग येतो. मी ज्यावेळी मंत्री होते त्यावेळी मला कित्येक देत असत. आता बीड जिल्ह्याची अवस्था काय झाली आहे ? त्यांनी आपले मंत्रीपद भाड्याने दिलेली आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळामध्ये  काहीच बोलता येत नाही, अशी टीका पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता अप्रत्यक्षरीत्या केली.  

सध्या महाराष्ट्रमध्ये काय चालू आहे, कोणालाच समजत नाही. सरकार विरोधात बोलायचं नाही.  सत्ताधारी पक्षातील नेता म्हणतो की सरकार मजबूत आहे. विरोधी पक्षातील नेता सरकार पडणार असल्याचे सांगत आहे.  मात्र जनतेसाठी काय करत आहे याच्यावर बोला. वाढत्या गुन्हेगारी विरोधात काय करत आहात याच्यावर बोला. सत्ताधारी विरोधी पक्षांनी आपली भूमिका व्यवस्थितरीत्या पार पाडायला हवी, असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे.


ह्याचा प्रसार करा
अर्थकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us