Site icon Aapli Baramati News

चंदन तस्करी प्रकरणी पुण्यात एक जण पोलिसांच्या ताब्यात; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

खंडणीविरोधी पथकाने चंदनाची तस्करी करणाऱ्यास अटक केली आहे. त्याच्याकडून १०२ किलो ओल्या चंदनाच्या लाकडाची तुकडे आणि वाहतुकीसाठी वापरलेली चारचाकी जप्त करण्यात आली आहे. लक्ष्मण भीमा गायकवाड (वय.४२ रा. तरडोबाचीवाडी, शिरूर) असे अटक केलेल्या तस्कराचे नाव असुन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणाची अधिक माहिती अशी की, खंडणीविरोधी पथका नगर रस्ता या भागात गस्त घालत होते. पेरणे फाटा भागातून या कारमधून येणाऱ्या एका व्यक्तीकडे चंदनाची लाकडाचे तुकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या गाडीला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने गाडी थांबवली नाही. पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग करून गाडी थांबवली. गाडीची तपासणी केली असता त्यात त्यांना १०२ किलो वजनाचे लाकडाचे तुकडे आढळून आले.

पोलिसांनी चंदनाची लाकडे, वाहतुकीसाठी वापरलेलीचारचाकी जप्त केली आहे. चंदनाची झाडे तोडून नेणाऱ्या चोरट्यांकडून चंदनाची लाकडे  विकत घेऊन लक्ष्मण गायकवाड हा तस्करी करत असल्याचेही बोलले जात आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण इंगळे, राहुल उत्तरकर, विजय गुरव, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे यांनी केली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version