नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सोम्य्या पिता – पुत्रांवर हल्लाबोल केला होता. त्यांनी केलेल्या आरोपानंतर भाजप नेते किरीट सोमय्या दिल्लीत गेले होते. पक्षातील विविध नेत्यांशी चर्चा करून त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
वाधवान आणि निकॉन कंपनीशी किरीट सोमय्या यांचा आर्थिक संबंध असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावर पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर देताना किरीट सोमय्या म्हणाले की, माझी चौकशी करायची असेल तर खुशाल चौकशी करा. मला जेलमध्ये टाकायचे असेल तर मी जेलमध्येही यायला तयार आहे. परंतु ते कोविड सेंटर घोटाळ्याच्या आरोपींना अटक करत नाहीत ? कंत्राट मिळवून देण्यासाठी कंपनीची बनावट कागदपत्रे दिली आहेत. त्यामुळे या बोगस डॉक्टरांमुळे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
पीएमसी घोटाळ्यात त्यांच्यावर आरोप केला होता. त्यासाठी संजय राऊत चौकशीसाठी का सामोरे गेले नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ठाकरे कुटुंबीयांचे अलिबागमध्ये १९ बंगले आहेत की नाही हे पाहण्यासाठी रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांना घेऊन जा. जर अलिबागमध्ये ठाकरे कुटुंबीयांच्या मालकीचे बंगले नसतील तर मग त्यांनी कर का भरला असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.