Site icon Aapli Baramati News

ऑक्सिचेन व ऑक्सिवीन ॲपचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

जिल्हा प्रशासन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व हिराबाई बुटाला विचार मंच यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या ऑक्सिचेन व ऑक्सिवीन ॲपचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन पुणे येथे करण्यात आले.            

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव,जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल,  पोलीस अधीक्षक डाॅ.  अभिनव देशमुख  अपर जिल्हाधिकारी विजयसिंह  देशमुख, हिराबाई बुटाला विचार मंचचे कौस्तुभ बुटाला व  पदाधिकारी उपस्थित होते.

ऑक्सिचेन ॲपमध्ये ऑक्सिजन पुरवठा साखळी व्यवस्थित करण्यासाठी आणि सद्यस्थितीत मागणी पुरवठा परिस्थिती अंदाज घेण्यासाठी आहे.  या ॲपमध्ये जिल्ह्य़ातील ऑक्सिजन उत्पादक, रिफिलर्स,वितरक आणि रूग्णालय यांचा समावेश आहे.     ऑक्सिवीन ॲपमध्ये संग्रहित डॅशबोर्ड आहे ज्यामध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशन वर आधारित डेटा तीन रंगाच्या श्रेणी मध्ये आहे समाविष्ट केला आहे.

स्व. रमेश वांजळे यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिकेचे लोकार्पण     

स्व.आमदार रमेशभाऊ वांजळे यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिकेचे  लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन पुणे  येथे करण्यात आले. यावेळी हर्षदाताई वांजळे, नगरसेविका सायली वांजळे,नगरसेवक गणेश ढोरे व कार्यकर्ते उपस्थित होते.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version