मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील सत्ताधारी नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावण्यामागे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे कारस्थान आहे. अधिकाऱ्यांना ते प्रत्येक नेत्यामागे ईडी कशी लावायची याचे मार्गदर्शन करतात, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी केला आहे.
महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न फडणवीस जरी करत असले तरी राज्यातले सरकार आमच्या ताब्यात राहणार आहे. आम्ही केंद्रातील सरकारही लवकरच ताब्यात घेऊ, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्रातील भाजपची सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे भाजप करत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमागे ईडी लावत आहेत. ईडी लावल्याने सरकारमधून हे पक्ष बाहेर पडतील, असे त्यांना वाटत आहे. पण त्यांचा हा गैरसमज असल्याचा त्यांनी सांगितले.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्राद्वारे तपास यंत्रणेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यावर पत्रकार परिषद घेऊन भाजपने टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देत मलिक यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.