Site icon Aapli Baramati News

अहमदनगर जिल्ह्यातील दुर्घटनेप्रकरणी कठोर कारवाई होणार : अजित पवार

ह्याचा प्रसार करा

अहमदनगर : प्रतिनिधी

अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीमुळे १० रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील दुर्घटनेप्रकरणी दोषी व्यक्तीवर कडक कारवाई करणार, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षास आग लागून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले व दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांबद्दल सहवेदना व्यक्त केल्या आहेत. 

दरम्यान , या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सखोल चौकशी करण्याचे व हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याचे निर्देश सर्व संबंधित विभागांना तात्काळ देण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. 

जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. रुग्णालयातील अन्य रुग्णांच्या सुरक्षिततेची व आरोग्यसेवेची संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version