Site icon Aapli Baramati News

यंदाच्या मोसमातही प्रेक्षकांशिवाय खेळवले जाणार का आयपीएलचे सामने?

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

यंदाच्या मोसमातील आयपीएलला २६ मार्चपासून सुरुवात होत असून चाहत्यांमध्ये कमालीची उत्साहाचे वातावरण आहे. यंदाचे आयपीएलचे सर्व सामने महाराष्ट्रात होणार असून त्यापैकी ७० सामने हे मुंबई आणि पुण्यात होणार आहेत. राज्य सरकार आणि गव्हर्निंग काऊन्सिलने २५ % प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी दिली होती. परंतु आता ही परवानगी राज्य सरकार मागे घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाही आयपीएल सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोरोनाचे सावट पुन्हा एकदा आयपीएलवर घोंगावत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. चीन, दक्षिण कोरिया आणि युरोपियन देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. तेथील रुग्ण संख्या दिवसेंदिवस झपाट्याने होत आहे.याबाबत केंद्र सरकारकडून एक पत्र मिळाले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

गतवर्षी आयपीएलला कोरोनाचा फटका बसला होता. गतवर्षी आयपीएलमधील काही क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण झाल्याने सर्व सामने अर्ध्यातच खेळणे बंद केले होते. त्यानंतर काही महिन्यानंतर पुन्हा ते खेळवले गेले. यंदाही कोरोना रूग्नसंख्या वाढत असल्याने  गतवर्षीप्रमाणे यंदाचा ही मौसम प्रेक्षकांशिवाय खेळाला जाणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version