Site icon Aapli Baramati News

‘खेलो इंडिया’ महिला लीग पिंचाक सिलाट स्पर्धेत विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थिनींनी मिळवली २७ पदकं..!

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

महाराष्ट्र पिंचाक सिलाट असोसिएशनतर्फे खेलो इंडिया महिला पिंचाक सिलाट लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये बारामती आणि भिगवण येथील ३७ विद्यार्थिनींनी सहभाग घेत २७ पदके मिळवली. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मान्यतेने नवी मुंबईतील क्राईस्ट अकादमी येथे या स्पर्धा पार पडल्या.

या स्पर्धा सर्व वयोगटातील मुलींसाठी घेण्यात आल्या.  त्यामध्ये महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यातील ५३५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. बारामती येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडियम स्कूल आणि भिगवण येथील अनंतराव पवार इंग्लिश मिडियम स्कूलच्या ३७ विद्यार्थीनी या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. योद्धा स्पोर्ट्स अकादमीचे मास्टर साहेबराव ओहोळ, प्राचार्या सौ. सरिता शिंदे यांनी संघाला मार्गदर्शन केले.

या स्पर्धेत टँडिंग (लढा) क्रीडा प्रकारात निधी पतंगे, श्रावणी माळी, तेजश्री मुळीक, श्रेया गर्जे, मनस्वी कोकरे, प्रणिती बंडगर, यशश्री माने यांनी सुवर्ण, स्नेहल दाताळ, समृद्धी गायकवाड, प्रज्ञा बनसुडे, वैष्णवी गुळवे, परिणिता रुपनर या विद्यार्थिनींनी रौप्य आणि वसुंधरा पारकाळे, सिद्धी वाघ, निकिता कडू, प्रांजली गायकवाड, स्नेहा मेंगावडे, मनस्वी कणसे, स्नेहल झिरपे, संयोगिता यादव, आर्या बोडरे, खुशी शर्मा यांनी कांस्य पदक मिळवले.

तर तुंगल प्रकारामध्ये अनुष्का गवळी, स्नेहल झिरपे, अथश्री माने यांनी रौप्य, सोलो प्रकारात श्रावणी माळी हिने सुवर्ण आणि आर्या बोडारे, स्नेहल झिरपे यांनी रौप्य पदक मिळवले. गांडा प्रकारात अनुष्का गवळी, श्रेया गर्जे या दोघींनी सुवर्ण, यशश्री माने, वैष्णवी गुळवे यांनी रौप्य पदक मिळवले. रेगु पदक प्रकारात आर्या बोडारे, श्रेया गर्जे, वैष्णवी गुळवे यांना सुवर्ण आणि पूजा कित्तुरे, प्रज्ञा बनसुडे, प्रिती केकाण यांना रौप्य पदक मिळाले.

या स्पर्धेत पुणे ग्रामीण संघाने तृतीय क्रमांकाचा सांघिक चषक मिळवला. पुणे ग्रामीण संघाने १० सुवर्ण, ८ रौप्य आणि १३ कांस्य पदके जिंकली. उपमुख्यमंत्री अजित पवार, विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, अॅड.  ए.व्ही.  प्रभुणे, सचिव निलिमा गुजर, डॉ. राजीव शहा,  मंदार सिकची, युगेंद्र पवार, किरण गुजर आणि रजिस्टार कर्नल श्रीश कंबोज यांनी या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कौतुक केले. या विद्यार्थिनींना ज्योत्स्ना चोरमले, हर्षदा बोडरे यांच्यासह प्रशिक्षक अमृत मलगुंडे आणि आदित्य आटोळे यांनी मार्गदर्शन केले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version