नवी दिल्ली : वृत्तसंस्था
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा भालाफेकपटू नीरज चोप्राला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक देवेंद्र झाझारियाला पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येल केंद्र सरकारकडून पद्म पुरस्काराची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये आठ क्रीडापटूंना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.
अथलॅटिक्समध्ये भालापेकीच्या प्रकारात नीरज चोप्राने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. नीरजने चोप्राने ८७.५८ मीटर भालाफेक करुन भारताच्या खात्यात सुवर्णपदक जमा केले. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत भारताला एकमेव सुवर्णपदक मिळवून दिले. पॅरालिम्पिकमध्ये देवेंद्र झाझारियाने भारतासाठी रौप्यपदकाची कमाई केली. सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारा देवेंद्र झाझारिया हा एकमेव खेळाडू आहे. देवेंद्र झाझरियाने ऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत भारतासाठी दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकाची कमाई केली आहे.
पद्म पुरस्कार जाहीर झालेले क्रीडापटू :
नीरज चोप्रा, भालाफेकपटू, हरियाणा
देवेंद्र झाझरिया, भालाफेकपटू, राजस्थान
सुमित अंतिल, पॅरालिम्पिक भालाफेकपटू, हरियाणा
शंकरनारायण मेनन, मार्शल आर्ट्स, केरळ
फैसल अली दार, कुंग-फू, जम्मू आणि काश्मीर
ब्रह्मानंद संखवाळकर, फुटबॉलपटू, गोवा
अवनी लेखरा, पॅरालिम्पिक नेमबाज, राजस्थान
वंदना कटारिया, हॉकी, उत्तराखंड
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला पद्मश्री तर; परॉलिम्पिक भालाफेकपटू देवेंद्र झाझारियाला पद्मभूषण पुरस्कार जाहीर
