
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरात पुरुष क्रिकेटबरोबरच महिला क्रिकेटला चांगली लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळे क्रिकेट रसिकांची महिला आयपीएल सुरू करावी, अशी मागणी बीसीसीआयकडे येत होती. बीसीसीआय या मागणीवर सकारात्मक असून २०२३ मध्ये महिलांसाठी आयपीएल सुरू होऊ शकते, अशी माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी दिली.
महिलांसाठी असलेल्या या लीगची सुरूवात पुढच्या वर्षी होणार असल्याने सरावासाठी खुप वेळ आहे. महिला आयपीएलची स्पर्धा पुरुषांच्या आयपीएल इतकी भव्य असेल, असे गांगुली यांनी सांगितले. स्मृती मंधाना, मिताली राज आणि जेमिमाह रॉड्रिग्स या भारतीय खेळाडूंनी महिला आयपीएल सुरू करण्याची मागणी केली होती.
आंतरराष्ट्रीय खेळाडूंनीही महिलांसाठी आयपीएलची मागणी केली होती. यावर्षी महिला संघाचे टी-ट्वेंटी चॅलेंज सुरू राहणार आहे. परिस्थिती लवकरच बदलेल, लवकरच बीसीसीआय आयपीएलसारखी महिला लीग सुरू करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलेल, अशी खात्री गांगुली यांनी व्यक्त केली.
ehaxi3
nbzoCtPs
OKqFCNuz
yn4gsf
ctOLwjYdgJ
mdwthHlYcXVK
kxZGBHWqnidSYK