Site icon Aapli Baramati News

बिग बॉस १५ मधील ‘ही’ जोडी अडकणार लग्नाच्या बेडीत..!

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी
बिग बॉस १५ मधील जोडी अभिनेत्री शमिता शेट्टी आणि अभिनेता राकेश बापट यांच्या प्रेमसंबंधाची माहिती सगळ्यांनाच आहे.याच शो दरम्यान ते एकमेकांच्या खूप जवळ आले. या शोमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली असून लवकरच ते लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
बिग बॉस कार्यक्रमाच्या घरामध्ये ज्योतिष आले होते.तेव्हा ज्योतिषांनी घरातील सर्व सदस्यांचे भविष्य सांगितले होते. त्यावेळी त्यांनी शमिता शेट्टी यावर्षी लग्न बेडीत अडकणार असल्याचे सांगितले होते. नुकताच शमिताने स्वतःचा वाढदिवस साजरा केला.तेव्हा तीच्यासोबत राकेश बापट होता. या जोडीला लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला असता शमिता शेट्टीने यावर प्रतिक्रिया देत राकेशसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
शमिता शेट्टी पुढे म्हणाली की, राकेश आणि माझ्यातले संबंध खूप चांगले आहे.जेव्हा मी बिग बॉसमधून बाहेर पडले तेव्हा मला समजल की राकेश माझी वाट पाहत आहे. आम्ही दोघे एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मी त्यांच्यासोबतच्या नात्यात खूप खुश आहे.यंदाच्या वर्षी माझं लग्न होत आहे.
कोरोना काळात मी खूप एकटी झाली आहे. माझं आयुष्य मी आतापर्यंत माझ्या अटींवर जगले आहे. पण आता कोणीतरी माझ्यासोबत आहे याचा मला आनंद आहे. बिग बॉस १५ मधील अभिनेता करण कुंद्राने देखील अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सोबत लग्न करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता शमिता शेट्टीनेदेखील राकेश बापट सोबत लग्नाची घोषणा केली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version