आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
मनोरंजन

तो मी नव्हेच.. अभिनेता संदीप पाठक यांचं स्पष्टीकरण; का द्यावा लागला खुलासा..?

मनोरंजन
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांतील निवडणुकीत पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा बहुमताने विजय झाला आहे. या  निवडणुकीत संदीप पाठक यांचा मोलाचा वाटा असून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. मात्र यामुळे महाराष्ट्रातील अभिनेते संदीप पाठक यांना स्पष्टीकरण देत ‘तो मी नव्हेच’ असं म्हणण्याची वेळ आली आहे.

आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये घवघवीत यश मिळवत सत्ता हस्तगत केली. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर संदीप पाठक यांना पंजाबमधून राज्यसभेत संधी देण्यात आली आहे. त्यावरुन अभिनेता संदीप पाठक यांच्या फोटोसह अभिनंदनाच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता अभिनेते संदीप पाठक यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं असून ‘आपल्याला ह्यात ओढू नका’ असे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून सांगितले आहे.

‘तो मी नव्हेच. आम आदमी पक्षाचे डॉ.संदीप पाठक यांची पंजाबमधून राज्यसभेवर निवड झाली आहे. माझी नाही. बऱ्याच ठिकाणी चॅनलवर माझे फोटो वापरत आहे. त्यामुळे ‘आप’ल्याला यात ओढू नका, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचे संदीप पाठक यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. परंतु अभिनेते संदीप पाठक यांची माध्यमांमध्ये फोटो वापरत होते. त्यामुळे तात्काळ त्यांनीही फेसबुक पोस्टच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.


ह्याचा प्रसार करा
मनोरंजन
Back to top button
Contact Us